स्वतःवरचं प्रेम...
स्वतःवरचं प्रेम...
1 min
96
स्वतःवर केलेलं निस्वार्थ प्रेम
कधीच अवजड एककेंद्री नसतं
दुसऱ्यावरच्या माणुसकीचं
निष्पाप प्रेमाचं प्रतीक असतं
दुःखाच्या डबक्यात विसावायचं
तर प्रेमाचा अथांग सागर
न डगमगता स्वप्रेमाच्या जिद्दीवर
तुडुंब वाहू द्यावी आपली घागर
आठवणींच्या एकोपी मनात
कुणा दुसऱ्याचा विचार असावा
समाधानाचा कोपरा असावा
स्वविचारांचा दुरावा नसावा
मनावरच्या दडपणाचं ओझं
भार का असावं स्वमुळावर
जग जिंकण्याचं असावं धाडस
स्वप्रेमावरच्या विश्वासावर
