STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

स्वतःसाठी लढ...

स्वतःसाठी लढ...

1 min
359

लाख होतील मिटवणारे प्रयत्न 

खेचण्याचे यशास मागे हर एक 

अपयशाचा ठपका जरी एकदा 

मिरवला माथ्यावर नकळत 

आयुष्यभर बोलबाला त्याचा

अनेकदा ऐकण्यास वेढा सज्ज 

जगणं करी वेळोवेळी मुश्किल 

हेवेदावे अविचारांचे क्षणोक्षणी 

विचारास लोकांच्या नको बळी 

स्वविचाराची पेटती मशाल 

लेखणीसमान हाती हवा ध्यास 

मुक्तीस एकदा तरी स्वतःच्या 

स्वतःच तुरुंगवास हिमतीने सोड

हक्क, अधिकार नि कर्तव्याची 

जाण ठेवूनि विचारी उच्च भरारी 

अडवणारे आढेवेढे नको आडकाठी 

निदान स्वतःसाठी स्वतःच लढ 


Rate this content
Log in