STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

स्वराज्यरक्षक संभाजी...

स्वराज्यरक्षक संभाजी...

2 mins
234

रात्री नऊ वाजताचा आम्हां सर्वांचा 

रोजचा चाले मालिकेचा दिनक्रम

एकत्र वेळ घालवण्याची आमची 

हीच एक संधी जणू एक उपक्रम 


शिवाजी नि संभाजीचा इतिहास 

जरी असला सर्वांनाच तोंडपाठ 

तरी एकमेकांना सांगत बसायचो 

दोन्ही राजांच्या पराक्रमाचा पाठ 


आकर्षक व्यक्तिमत्त्वांचा मेळ 

खूप सुंदररित्या रेखाटलेली पात्र 

नि अतिशय मार्मिक शब्दांचे खेळ 

जणू वाटतात समोर खरेच चित्र 


प्रत्येक भागात जायचो गुंतून 

स्वराज्याचा खडतर प्रवास वाटे 

जगलो स्वतः पात्रांच्या भूमिकेतून 

भावनांचा मनात काहूर असा दाटे 


जिजाऊंचा पाहावा कर्तव्य रुबाब 

कर्तबगारी येसूबाईंचा ताठ डोलारा 

राणू आक्काचा करारी छावा बाणा 

राजारामचा प्रेमळ मायाळू भाईचारा 


प्राणांची आहुती देणाऱ्या मर्दांचे 

सळसळते रक्त बाहुत मराठ्यांचे

भोळ्या-भाबड्या प्रजेचे पाहून प्रेम 

मन गहिवरून येते भावुक आसवांचे 


चेहऱ्यावरचा जिवंत हावभाव पाहून 

औरंगजेबाचा सुद्धा वाटतो खूप हेवा 

नकळत नाईलाजाने धक्के खाणाऱ्या 

अकबराचा नाही वाटत बघा दुरावा 


शेवटी आलीच घटिका वाट्याला 

जेव्हा झाले हाल शंभू छत्रपतींचे 

तेव्हा सर्वांच्या राहिले डोळ्यात उभे

अश्रू त्या अमर त्यागाचे नि निष्ठेचे 


संपला तो रोजचा सोबतीचा पाठ 

आता जरी उरल्या फक्त आठवणी 

मनामनात अजूनही घोळतात चित्र 

मग त्या भागाची रंगते मस्त मेजवानी 


Rate this content
Log in