STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

स्वराज्याच्या ढाली

स्वराज्याच्या ढाली

1 min
122

अद्वितिय आमुच्या गड किल्ल्यांची

शौर्य गाथा महान

महाराष्ट्राच्या धरती वरचे

वादळातले तुफान


बुरूज आजही साक्ष देतसे

जे मावळ्यांना वरदान

पोलादी त्या तटबंदीने

राखली स्वराज्याची शान


दगडांच्या या अभेद्य ढाली

रत्नांची जणू खाण

कोंढाणा जिंकून घेतला

तानाजीने मारला उदेभान


जलदुर्गाची अथांग ताकद 

उडवी शत्रूची दाणादाण

अतुल्य लढले गड किल्ले ते

जाहले इतिहासाचे विधान


Rate this content
Log in