स्वप्नफुले
स्वप्नफुले
1 min
486
धुंडाळल्या लक्ष वाटा
रगडले कण यत्नाचें
केला जीवाचा आटापिटा
न सापडले कधी किरण
न मिळाले कधी आशेचे कवडसे
न बदलले कधी नशिबाचे फासे
उदासीन फक्त चालायचे
परि चाहूल दिसेना कशाची
घेऊ कसे उसासे ....
एक दिवस अचानक
विरून गेले धुके
मार्गी यशोदीप लागले
लख्ख प्रकाशातले
मळभ दूर होऊ लागले ....
सजू लागले यशसोहळे
अलगद हळुवार कड्याकपारी
......आणि स्वप्न सजू लागले ....
खडकाळ जमिनीत आज
यशांकूर अलवार फुलू लागले ...
....आणि स्वप्न सत्यात उतरले ....
