स्वप्नातला गाव
स्वप्नातला गाव

1 min

19
स्वप्नात पाहिला एक छानसा गाव
'चिमणीपाखरं' त्या गावाचे नाव...
अगणित चिमण्या की हो त्या गावात
खूप वेगळेपणा गावाच्या हो नावात...
चिमण्यांशी छान संवाद साधला
त्यांच्या सुखदुःखांचा बांधच फुटला...
चिऊताईंनी आपले मनमोकळे केले
सारेच मनातले कथन करून टाकले...
शाळा चिऊताईंची नाही भरत आता
बाईच नाही वर्गात नाही मारत बाता..
चिऊताईंशी हितगूज छानच झाली
गप्पांमधे सारीच छान, छान रमली...
मैत्री झाली स्वप्नवत या सर्वांची
हाक मारली आईने तुटली माळ स्वप्नांची...