स्वप्नातील संध्याकाळ
स्वप्नातील संध्याकाळ
1 min
547
ती स्वप्नातील संध्याकाळ
वाटे मज पुन्हा दिसावी
क्षितिजावर वासरमणी अस्ताची
सांज पुन्हा अनुभवावी
पक्षीगण माघारी घरट्याकडे
अंबरी ती माळ अजून पाहावी
सृष्टी सौंदर्याची अमृतधारा
डोळ्यांनीच भरभरून प्यावी
संध्येच्या साक्षीने साजणा
तुझी न माझी प्रीत फुलावी
वाटे मज पुन्हा एकदा
ती स्वप्नातील संध्याकाळ दिसावी
