स्वप्नांचा बाजार
स्वप्नांचा बाजार
1 min
169
बाजार स्वप्नांचा भरला,
मज खूण दिसेना,
जगण्यातल्या हिरवळीचा,
मज स्पर्श मिळेना. .१.
वाट स्वैर मी चाल चालते,
एक आभासी स्वप्न पाहते,
स्वप्नामधूनी जागृतीचे,
एक आगळे पर्व खोलते. .२.
कधी कातर तर कधी हासरे,
कधी अपूर्ण ,कधी पूर्णाचे,
कधी आभाळी तर कधी पाताळी,
असे स्वप्नांचे दालन खुलते. .३.
मोहमयी या बाजारी,
रंग स्वप्नांचे खुप रंगती,
रंगीत होऊनी, सहजतेने
प्राक्तनाचे झेल झेलती. .४.
