स्वप्न
स्वप्न
प्रीतीच्या चंदेरी दुनियेत
तुझी साथ देशील का?
सखे तुझ्या नाजूक अधरांनी
नाव माझे घेशील का?
शब्द तुझे पण कधीतरी
माझ्यावर कविता रचशील का?
झाडावरचे गुलाब फुल
माझ्या नावाचे डोक्यात कधी खोवशील का?
फक्त माझ्याच आठवणी साठवून
उरात तुझ्या ठेवशील का?
पहाटेचा प्राजक्त सडा
पदरात तुझ्या घेशील का?
डोळ्यात तुझ्या धुंद प्रेमात
मला सामावून घेशील का?
माझ्या जीवनातील इंद्रधनूत
सप्तरंग तु भरशील का?
माझी नी तुझी सावली
कधीतरी एक होईल का?
आयुष्याची सहचारिणी बनून
तु फक्त माझीच होशील का?
वर्षाच्या सरींप्रमाणे गोड वर्षाव करत
सर्वांगावर बरसशील का?
माझ्या आठवणीने डोळे पाणावून
सखे तु मला शोधशील का?
अर्धनारेश्वराप्रमाने माझ्या शरीरात
सामावून जाशील का?
माझे नाव आठवून
गोड स्वप्न बघशील का?
