STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Others

4  

KUSUMANAND ANAND RAUT

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
354

पुन्हा येतो  मी  नदीकाठी 

ते अतुल्य स्वप्न वेचण्यासाठी 

हरवत चाललेला  क्षण क्षण

मनात आत आत साठवण्यासाठी


पुन्हा येतो मी नदीकाठी 

वाहून  गेलेल्या जनावरांसाठी 

हरवून दुरावलेल्या लेकरांसाठी

भिजून तुटलेल्या संसारासाठी 


नदी सांगते मला ठणकावून 

या स्वप्नात अडकू नकोस 

ते वाहू  इच्छितात 

त्यांना तू अडवू नकोस 


या अशा वाहण्यातही  

जगानिराळी कथा आहे

त्यात तुझं काहीच नाही  

हीच तुझी व्यथा आहे 


एक स्वप्न अपूर्ण राहिल्याने 

जीवन अधूरं राहत नसतं 

साचलेलं कोणतही डबकं

कधीही वाहात नसतं 


जे घडलं ते काल झालं 

आज सारं नव्याने हातात आलं 

भूतकाळ जर विसरून जाल

तरच वर्तमान आनंदाने जगाल


नवी स्वप्नं तुला पाहावी  

लागतील या धन्य जीवनासाठी

दुःखी अतिसामान्य मनासाठी

पुन्हा येतो मी नदीकाठी 

नवी स्वप्ने पाहण्यासाठी 


पुन्हा  येतो  मी  नदीकाठी 

ते  अतुल्य  स्वप्न वेचण्यासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन