STORYMIRROR

Seema Pansare

Others

4.8  

Seema Pansare

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
245

आनंदे नाचावे बागडावे

फिरुनी व्हावे लहान

यावे ते शाळेतले दिन

जेव्हा आला मला सखीचा संदेश

झाले वर्ष तीस सोडून शाळेस..


उडाली ज्ञानपाखरे चौखुर

ज्ञानमोती चोचीत घेऊन

कोण कुठे कोण कुठे

 नाही थांगपत्ता पता कुणाचा

विखुरली तिकडी महिमा ईश्वराचा


आला आहे संदेश सखीचा

इंटरनेट झिंदाबाद

भेटू आम्ही होऊ पुन्हा लहान


 रमू आम्ही गाऊ गीत

स्मरू सारे बालपण

हे मात्र खरे की

शालेय मैत्रिण भेटावी 

निदान फोन तरी यावा

 हे स्वप्न खरे झाले



Rate this content
Log in