स्वप्न वडिलांचे
स्वप्न वडिलांचे
1 min
37
स्वप्न करतो साकार
वडिलांनी जे पाहिले
आदर्श माझ्यासाठी
आयुष्य त्यासाठी वाहिले
शिकून होईल साहेब
मोठा तालुक्याचा
नाव येईल पेपरात
डंका होईल आदर्शाचा
हाडाची काडे केली
पोटाला चिमटा दिला
दिनरात मेहनत केली
उपवास ही घडला
फाटकं सार स्वत
घेतलं नाव दिलं मला
त्यांचे अनंत उपकार
हिम्मत दिली जगण्याला
सादर मी राहुल
स्वप्न साकारणार
आई-वडिलांनी जेव्हा
दिला मी आधार होणार
