स्वप्न माझे
स्वप्न माझे
1 min
439
पावा वाहे झुळू झुळू वारयासंगे रानीवनी,
गोड गोड गाणी कसी हळू हळू येती कानी,
सूर बासरीचे कसे थिरकत घुमतात,
अंगावर जसे काही मोरपीस फिरतात,
मनातले पक्षी पुन्हा आसमंती झेपावती,
अन स्वप्न पाहताना तुझ्यासंगे विहरति,
अलगुज कानामध्ये अलगद मंजुळतो,
पहाटेच्या कुशीतून स्वप्न माझे सोडवितो,
पहाटेच्या कुशीतून स्वप्न माझे सोडवितो
