STORYMIRROR

Vinay Dandale

Others

3  

Vinay Dandale

Others

स्वप्न बळीराजाचं

स्वप्न बळीराजाचं

1 min
316

वैशाखवणव्याने आक्रंदणारी माती 

मृग रोहिणीच्या आगमनाने 

सुखावून जाते...


सुखावलेली माती न्हातीधुती झाली की, 

मग आषाढातील पाऊस 

तिला चिंबचिंब भिजवून जातो

तिच्या कस्तुरीसम सुगंधाने 

बळीराजाही चिंब होतो आनंदात, 

पोटापाण्यासाठी पोटालाच ओटी बांधतो, 

या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत 

 

त्याच्या जिद्दीलाही सलाम असतो 

त्या सलामातून उगवते, भरारते 

हिर्वेगार पीकपाणी 

दिसते त्यालाही कष्टाच्या घामातून 

डौलात फुललेले मोती 

हसत... हसत...

डोलणाऱ्या पिकांच्या तालावर 

आपल्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नात 

रमून जातो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन