स्वप्न आशा...
स्वप्न आशा...
सदैव वाट पाहतो माणूस
एका दिव्य शोधाची स्वतःत
भेटणाऱ्या प्रत्येक नव्या आशा
दैदिप्यमान करण्यास स्वप्नात...
पहाट होईल स्वप्नांच्या पूर्ततेची
पुन्हा पुन्हा पाहतो वाट आशेवर
जगण्याचे नाव ओळखून जीवन
ठाम राहून स्वतःच्या विश्वासावर...