STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

स्वप्न आहे माझं

स्वप्न आहे माझं

1 min
182

एक स्वप्न आहे माझं करावी 

अखंडित सेवा साहित्याची |

वेड मला वाचन, लिखाणाचे 

प्रचंड गोडी आहे साहित्याची | |१| |


चारोळ्या, आठोळ्या, षडाक्षरी,

अष्टाक्षरी, दशपदी, अभंग लिहते |

लेख, निबंध, कथा, कादंबऱ्या, नाट्य

समिक्षा, ग्रंथवाचन हे मी शिकते | |२| |


साहित्यातील सर्वच क्षेत्राची

माहितीही करुन घेत मी आहे|

नवनवीन साहित्य प्रयोगाची

उजळणी करुन नि लिहून पाहे | |३| |


साहित्य देईल ज्ञान, मनःस्थितीत

योग्य तो बदल असते घडवेल |

साहित्यसेवा निखालसपणे करता

मान, सन्मान, पुरस्कार मढवेल | |४| |


Rate this content
Log in