सवंगडी
सवंगडी
1 min
300
शाळेचे शिक्षण पुर्ण करून
सगळे सवंगडी गुंतले
आपापले भविष्य उज्वल करण्यात
ना घडे भेट त्यामुळे त्या मित्र जणांची ।।1।।
आला असा योग जुळुनी
भेट घडली ती मोबाईल मुळे
मग सरसावले सर्व सवंगडी
दुरावलेल्या मित्रांना एकत्रित करण्यात ।।2।।
आणि तयारी सुरु झाली सहलीची
भेटीगाठी झाल्या गप्पा गोष्टींना उधान आला
जुन्या आठवणीत रमले सारे मित्र सखे
नाते मैत्रीचे जपण्या मित्र सारे जमले ।।3।।
