STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

स्वच्छंदी

स्वच्छंदी

1 min
501

आकाशाच्या छताखाली

हरित मखमली भूवरी

एक स्वच्छंदी फुलपाखरू

मजेत उडे फुलांवरी


मनात येई तेव्हा उडे

मनात येई तेव्हा बसे

बहुढंगी रंगांनी सजले

सुंदर, मोहक किती दिसे


पारख फुलांची असे करी

जणू रत्नपारखी

फुलांच्या ताटव्यावरी बसे

भासे मोत्यासारखे


रात्रंदिन स्वैर होऊनी

फिरे नाना ठिकाणी

सोबत त्याची असता

आनंदी होई फुलराणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन