STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

1 min
190

इंग्रजांचे होते अधिराज्य

कार्य कराया महान 

नाशिक जिल्ह्यातील भगूर

जन्माला आला बाळ छान 


अन्यायाला फोडली वाचा

काळ्या पाण्याची शिक्षा झाली

शिक्षा होती प्राणांतिक

सागरालाही दया आली


विचारवंत, कवी आणि लेखक

लेखणीला केली तलवार

1857 चे स्वातंत्र्यसमर

या ग्रंथाने केला प्रहार


मानवता आणि विज्ञाननिष्ठा

समाजसुधारणेचा पाया मानले

अन्यायाविरुद्ध बंड पुकारून

मातृभूमीचे ऋण फेडले


स्वातंत्र्यासाठी दिली प्राणांची आहुती

स्वातंत्र्यवीर नावाचे सार्थक झाले

अशा त्यांच्या महान कार्याला

आम्ही त्रिवार वंदन केले


Rate this content
Log in