स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
स्वातंत्र्याची ज्योत पेटली खरी
पण ज्योतीचा प्रकाश हरवला आहे
देशात महागाईच्या प्रमाणाची वाढत आहे दरी
वाढत्या भ्रष्टाचाराने देश पोखरला आहे
हक्काची जाणीव नसल्याने हक्कच हिसकावून घेतले जात आहे
मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून मिळवले तरी काय
वाढती दहशत बघून धरती माय रडत आहे
मग स्वातंत्र्य मिळवून मिळवले तरी काय
ब्रिटिश देश सोडून गेले खरे
पण गुलामी काय गेली नाही
स्वातंत्र्य मिळवून वाटले होते बरे
पण आपल्या राजकारणांनी अन्याय करणे सोडले नाही
अन्यायाविरुध्द पेटून उठायची आता हिम्मतच उरली नाही
कारण देशामध्ये समाजकंटकांचा अंहकार उसळला आहे
देशभक्ती आणि समाज हित याला आता अर्थच उरला नाही
कारण गुलामी पत्कारायची आता सवय लागली आहे
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देखील आता भीती वाटू लागली आहे
कारण अन्यायाची जाणीवच कोणाला राहिली नाही
माणसातला माणूसपणच आता हरवत चालला आहे
कारण फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत कोणालाच राहिली नाही
