स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन
1 min
561
स्वातंत्र्य दिन आले
मन आनंदी झाले
क्रांतीच्या आठवणी
ह्या मनात दाटले
पर्वा नाहीच केली
आपल्या जीवनांची
देऊन बलिदान
सेवा केली देशाची
आठवण करून
त्या क्रांतिकारकांची
मनी ज्योत पेटवू
या स्वातंत्र्य दिनाची
जय हिंद चा नारा
घुमवू चराचरात
भारत देश माझा
बोलू मनामनात
