स्वामी समर्थ
स्वामी समर्थ


स्वामी समर्थ
जीवनाचा हा अर्थ
भक्तीत सदा
अक्कलकोटी
पूर्ण दत्तावतार
समर्थ सार
दत्तनगरी
वटवृक्ष मूळ तू
उभा रूपेरी
विशाल भाळे
तेज वर्णावे किती
आकर्ण डोळे
सुहास्य मुख
सरळ नाक, भक्त
विसरे दुःख
दंतपक्तीत
कुंदकळ्या समान
शुभ्रवर्णित
नटलासी तू
भक्ता तारावया तू
अनंतरूपे
चरणस्पर्श
घडो सदा सर्वांना
हीच प्रार्थना
संघर्ष जगी
तुम्हाविन ही व्यर्थ
स
्वामी समर्थ
नामस्मरण
स्वामी समर्थ मंत्र
प्रत्येक क्षण
भक्तजनाला
येती भेटावयाला
स्वामी समर्थ
तू स्वामी नाथा
ज्ञाता आणि ज्ञान तू
सदा सर्वथा
दडला येथे
साऱ्या सुखाचा अर्थ
स्वामी समर्थ
कृपाशीर्वाद
घडो सदा आम्हास
स्वामी राजस
तूच समर्थ
दासाकडे पहावे
सौख्य तू द्यावे
व्हावा कृपेने
अध्यात्मिक विकास
माझा प्रयास
स्वामी राहती
नित्य भक्तांच्या पाठी
भय पळती