Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Babu Disouza

Others


3  

Babu Disouza

Others


स्वाभिमानी

स्वाभिमानी

1 min 222 1 min 222

होऊ नये अंकित प्रतिभेने कुणाचेही

बनू नये भाट ,बटीक कधी कुणाचेही

सवंग प्रसिध्दीच्या हव्यासाने भले भले

चाटू नयेत पाय पदासाठी कुणाचेही

-१-

लाभासाठी नको उगा कुणाची हाजी हाजी

काही कर्ज शिरावर नसावे कुणाचेही

-२-

विद्वत्तेचे नको ते प्रदर्शन अहंकारी

झाले नाही भले अशाने इथे कुणाचेही

-३-

नको दांभिकतेने बिरूदे ती मिरवाया

नसे मनात खरे असूयेने कुणाचेही

-४-

असो खडतर काळ आयुष्यात कितीही

पसरू नयेत हात समोर कुणाचेही

-५-

आभासी माध्यमांचे नसते खरेच काही

करावे मनाचे ऐकू नयेच कुणाचेही

-६-

तेढ वाढते खोट्या रचल्या त्या कहाण्यांनी

फॉरवर्ड करू नये संदेश कुणाचेही

-७-


Rate this content
Log in