STORYMIRROR

सुरेश पवार

Others

3  

सुरेश पवार

Others

स्वाभिमान

स्वाभिमान

1 min
243

हजारो वर्षापासून होत होती विटंबना,

माणूस मनसाचाच झाला वैरी,

बाबासाहेबांचा उदय झाला,

जणू दिन दलितांचे जन्मले कैवारी.।।१।।


जीवनात केला त्रास सहन,

कष्टाशिवाय मिळत नाही,

उंचावला शिक्षणाचा दर्जा,

शिकून सवरून बॅरिस्टर होई.।।२।।


दिन दुबळ्याला सूर्य गवसला,

जणू सर्वांचा आधार झाला,

काढल्या मोडीत जुन्या रूढी,

समाजाला उजेडाचा रस्ता दाखवला.।।३।।


होत होतो अन्याय अत्याचार,

संघर्षाचा लढा उभारला,

मागून कोण देत नाही,

न्यायासाठी जगाशी नडला.।।४।।


जणू समाजासाठी सूर्यतेज प्रकटला,

संविधानाचे मालक झाले,

संविधानाने न्यायदान दिले,

असे महापुरुष कधी न झाले.।।५।।


शिका सवरा संघटीत व्हा,

ज्वलंत मशाल हाती घेतले,

न थकली न थांबली,

लढा निरंतर चालू ठेवले.।।६।।


महती सांगू किती महामानवाची,

लेखणीतील शाहि संपेल,

महामानवाला शतशः प्रणाम,

दीनदुबळ्याचे तळपते सूर्य गवसले.


Rate this content
Log in