STORYMIRROR

Sanjeev Borkar

Others

3  

Sanjeev Borkar

Others

सूर्यास्त

सूर्यास्त

1 min
244


का ? झाले असते थोडे थांबले असते तर

का ? झाले असते माझ्या फोनची वाट पहिले असते तर


हट्ट मी नाही कधीच केला आजपर्यंत 

का ? झाले असते मला सोडून गेले नसते तर


मीही निघालो होतो मागे मागे यायला

का ? झाले असते एक फोन केले असते तर


गरजच का भासली फोन बंद ठेवण्याची

का ? झाले असते जातांना एक मिस कॉल 

दिले असते तर


किती जीव लावला मी कसे पटवून देऊ

का ? झाले असते थोडे भेटून निघाले असते तर


मी नाही समजू शकलो तुमच्या जखमांना कधी

का ? झाले असते जखम भरण्याची संधी ठेवले असते तर


सांगु नाही शकत मी किती आनंदात होतो

का ? झाले असते माझे मन आज वाचले असते तर


ए.सी. च्या हवेत विरून गेले सोनेरी स्वप्न माझे

का ? झाले असते मैत्रीचे नाते जपले असते तर


Rate this content
Log in