STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

सूर तुझ्या संगतीचे

सूर तुझ्या संगतीचे

1 min
185

🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺


सूर तुझ्या संगतीचे

मनात खोलवर रुजले

संगतीनेतुझ्या साजना

तन मन माझे मोहरले.....


सूर तुझा ताल माझा

नवे तराणे गीत छेडूया

संसाररूपी सागरतीरी

सुरासंगे बेधुंद बागडू या...,,


हाती हात घेवूनी मस्त

तालात ठेका देवून नाचूया

मयुरासवे मनाचा पिसारा

स्वच्छंद होवूनी फुलवू या.....


पाव्यातील सप्त सुरासंगे

प्रीतीची धुंद गीते गावू या

सजणासह सजणी साथीला

जरा या वळणावर विसावू या.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन