सुत्रसंचालक
सुत्रसंचालक
भौतिकशास्त्राचा जनक हा,
न्युटन हाच महान पाहा
वस्तुवरच्या बलाचे कार्य,
स्पष्टपणे सांगितले पाहा
वस्तुचे जडत्व सांगायला,
किती छान नियम मांडला
वस्तू अस्थिर असते सदा,
बल करी गतीमान तिला
वेगाची सरासरी मापाया,
वस्तुचे वस्तुमान सांगाया
वस्तुमानाच्या गुणा त्वरण,
सुसंगत बेरीज वस्तुच्या
महत्त्व क्रिया प्रतिक्रियेचे,
केले अगदी सोपे बाबाने
जे लावाल बल, तेच पुन्हा,
येईल पाहा त्याच वेगाने
न्युटनने दिले किती ज्ञान,
सुत्रे ही अद्भुत मांडुन
भैतिक शास्त्राचा हा जनक,
गेला खूप काही शिकवून