STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

सुशिक्षित अडाणी

सुशिक्षित अडाणी

1 min
529

वाढत चाललायं आकडा

कोरोनाच्या रुग्णांचा

ताळा सोडलाय जणू

मानवाने वागण्याचा


नाना कारणे सांगून

पोलिसांना काढतोय वेड्यात

घराबाहेर पडून अडकतोय

कोरोनाच्या जाळ्यात


कोरोनाच्या आतंकाकडे

डोळेझाक करतोय

भाजीपाल्यासाठी बिनधास्त

मंडईत गर्दी करतोय


दृश्य सारे मृत्यूचे

डोळयांनी बघतोय

तरीही सुशिक्षित हा

अडाण्यांसारख वागतोय


साहित्याला गुण द्या
लॉग इन