सुरुवात
सुरुवात
1 min
234
पायघड्यानी स्वागत केले
बँड पथक निघून गेले
विश्वासाने पाऊल टाकत
आदराने सीमा ओलांडत
ओळखी पाळखी नव्या
शब्दांस जागणाऱ्या हव्या
रेलचेल आवाजांची चालली
साथ मनांची ठरली
गाठ घालून सुरवात
साठले सारे नयनात
नियम सांगून मोकळे
सयमंचे बांधले झोपाळे
