सुरुवात झाली पावसाची
सुरुवात झाली पावसाची
1 min
206
लगबग चालू झाली कामाची
सुरुवात झाली पावसाची
विठ्ठलाचे / पांडुरंगाचे नाव होते मुखी
शेतकरी झालं क्षणात सुखी
बोलू लागली अबोल पाने आणि फुले
पावसात बगडू लागली छोटी-छोटी मुले
लगबग चालू झाली कामाची
सुरुवात झाली पावसाची
शितल थेंबामुळे अंगावरती फुटला शहरा
कष्टकऱ्यांना मिळू लागला पावसाचाच सहारा
आसरा शोधू लागले प्राणी आणि पक्षी
आता निसर्गाला येत होती वेगळीच नक्षी
धो-धो लागला कोसळू
आवेगाने सर्वजण आडोशासाठी लागले पळू
लगबग चालू झाली कामाची
सुरुवात झाली पावसाची
