सुरेल जीवन"
सुरेल जीवन"
ज्ञानाशी असावी प्रित
उलगडे जीवनी कोडी
समजून घ्यावी रीत
वल्लवित न्यावे होडी।।
संसाराचे जीवनगाणे
सुरेल जीवन जगणे
सदा हसत राहावे
रडू नये रडगाणे।।
जरी असे वनवास
ठेवा जगण्याची आस
भरूनिया जीवनी रंग
आनंदाची धरावी कास।।
उद्याची करून चिंता
आज ला का गमवावे
असो कितीही कामे
छंदाला या जोपासावे।।
होऊनी प्रिय सखा
एकमेकाला हसवावे
कुणाला ना दुखवावे
साऱ्यांनाच सुखवावे।।
इतरांना देऊन सुख
असावे खूप समाधान
ज्ञानोपासक होवून
मुंलाचे बनावे वाहनं।।
संसाराचा चीत्तचकोरा
आप्ताला ही हसवावे
नात्याचा हा गोडवा
आंनद गाणं बणावे।।
स्वकष्टाने फुलवावे
उभारावे आनंदवन
करू नये मनमानी
नकोच मनी कोंदन।।
