STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

सुनबाई

सुनबाई

1 min
165

आली आली सुनबाई

लक्ष्मीचे पाऊले घेऊन

होते दारातच उभी मी

स्वागताला पंचारती घेऊन।


टाकल्या फुलांच्या पायघड्या

लख रोषणाई प्रकाश दिव्याचा

झाली गोळा सगळे शेजारी

चेहरा बघण्या माझ्या लक्ष्मीचा।


दारी माप मी ठेवले ये तू

ओलांडून सोन्याच्या पावलाने

उखाणा घेता लेवकाच्या नावाचा

कान टवकारले घरातल्या भिंतीने।


नणंद तुझी आहे मैत्रिणीसारखी

गुजगोष्टी कर तीस मनातल्या

पित्यासमान आशीर्वादाचा हात

डोक्यावरी तुझ्या सासऱ्यांचा।


प्रत्येक गोष्ट मी तुला नवीन

घरातली समजून सांगेन

आहे आई समान मी तुझ्या

घे गोजिरवाणे घर माझे सांभाळून


साहित्याला गुण द्या
लॉग इन