STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

सुखाचा सागर

सुखाचा सागर

1 min
484

आहे माझिया घरात

सुखाचे भांडार

मिळे मायेची पाखरण

हेच जीवनाचे सार..........१


आई विठाई माझी

जणू प्रेमाचा सागर

हृदयी जिव्हाळ्याचा झरा

वाणी माधुर्याचे आगर.........२


जननीचे मुखकमल

भासे चंद्राची तेजस्विता

तिचे मनरूपी पंकज

जणू गंगेची निर्मलता.........३


आत्मा आणि ईश्वर

यांचा संगम असे माऊली

माझ्या अंतरी वास करी

धन्य वात्सल्य सावली..........४


नांदे सौख्य घरात

दरवळे हा अबीर

तुळशी सम पवित्र

वैभवाचे हे मंदिर...........५


काय सांगू मी आईचा

महिमा हा अपरंपार

या अमृतवेलीवर फुले

उमलती सदाबहार............६ 


Rate this content
Log in