सुखाचा एक घास...
सुखाचा एक घास...
1 min
271
बोलणंसुद्धा इतकं महागलंय
कसं नातं आता निभवायचं
गमतीत सुख म्हटलं शोधायचं
तर गंभीर झालाय हो मामलाच
शब्द जितके आहेत महत्वाचे
तितकेच ते गोड विष ओकणारे
पण अर्थाचा अनर्थ अनेकदा जेव्हा
घोळ नुसता काहीसा उद्वेगाचा तेव्हा
शब्दांवरच सुखात जगणाऱ्याने
सानिध्यात त्यांच्या विसावणाऱ्याने
परिणामी कशात हो शोधायचा
सुखाचा एक मनस्वी घास..?
