सुख काय असतं?
सुख काय असतं?
1 min
234
मार्ग हा सरून गेला
पण सुखाचा पत्ता नाही लागला
स्वप्न बघता बघता
ओंजळ ही रिकामीच रहाली
मी माझा एकांत निवडला
ना कधी कोणाशी संगत केली
वाटले मला कधी तर मी मनाशीच संवाद करे
एकांतचं मला हा प्रिय वाटू लागला
दुःखाला सुख मानुनी
मनात भाव सदा जपले
ह्या सगळ्या कचाट्यात मात्र
निद्रा माझी कुठेतरी हरवली
आता हेच माझे जगणे
ह्यालाच मी माझा सखा मानूनी
ह्याच्यापरी संवाद माझा चाले
सरले आता सर्व काही
सुटकेची मी वाट पाही
