STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

सुगावा

सुगावा

1 min
211

सुंदर तरूणीने रूबाबदार तरूणाला

विजय सिनेमा हाॅल मधे पाहिले

पाहताच तरूणाच्या नयनबाणास

तरूणीचे नयन चोरून हो मिळाले..


प्रेमाची मंजूळ बासरी ह्रदयी वाजली

पण दोघांनाही पत्ता लागला नाही

संपला सिनेमा मनी ताशा वाजू लागला

प्रीतीची सतार अंतरी वाजू पाही....


ना नाव माहिती ना पत्ता माहिती

तरूणाने तरूणीचा सुगावा काढला

तरूणीची ह्रदयाची धडधड वाढली

या प्रीतीतच तरूण आता दंग राहिला..


तरूणीने तरूणाला होकार दिला

तरुणाने मस्त हवेतच उडी मारली

दोघांचेही झाले मनोमिलन प्रीतीचे

एकमेकांच्या सुखात दोघेही रमली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन