STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

3  

Sharad Kawathekar

Others

सुडाचा प्रवास

सुडाचा प्रवास

1 min
344

आयुष्याच झाड निष्पर्ण होतं होतं उजाड होत चाललय

ऋतू संपून गेलेत वसंत गेला आता शिशीराची चाहूल लागलीय

कधीतरी पक्षांचा चिवचिवाट

निळ्या आभाळाचा गजबजाट मोहक वाटायचा

पण आता ...

तो चिवचिवाट नकोसा वाटतो

मागं कधीतरी झालेली सल पुन्हा बोचायला लागतेय

संवेदना जाणीवपूर्वक आठवण करून देतायत येणाऱ्या शिशीराची

हळव्या जखमा पुन्हा पुन्हा स्मरणात येतायत

मनातल मन शोधत ह्रदयापर्यत जाऊन आलो

तेही तिथूनही पळवाट काढत कुढंस गायब झालं ते समजलंच नाही

अन् पुन्हा एकदा ...

भन्नाट एकाकी पणातून तुझी जिवंत प्रतीमा

दूरवर कुठंतरी निघून गेलीय

आणि आता परत सुरू झालाय

आठवणीच्या सुडाचा एकाकी प्रवास

मौनांचा आकांत सुरू झालाय

मीरेची वाळवंटातली पाठमोरी प्रतीमा

मनाला खोलवर कुठंतरी काचायला लागलीय

शिशीरांची चाहूल कुजबुजायला लागलीय


साहित्याला गुण द्या
लॉग इन