सुदाम्याचे घर
सुदाम्याचे घर
1 min
233
राजवाडा असेलही मोठा
सुदाम्याच्या या घरापेक्षा
मनावर राज्य करतो
त्याचा 'मित्र' जुना...
एका खोलीचे हे
सुदाम्याचे घर छोटे
भिंतीवरी घराच्या आहे
'कृष्ण' नाव कोरलेले...
कान्हाच्या नामस्मरणात सुदामा
असतो दंग नेहमी
आपल्याच घराचा राजा
कृष्णाचा हा सवंगडी...
