सत्य
सत्य
1 min
253
हास्यात सांग या दडलय काय?
रीत
सुलभ ही जगण्याची
हृदयात सांग या दडलय काय?
प्रीत
आंधळी जगताची.....
मनात सांग या दडलय काय?
दिशा
आत्मविश्वासाची......
कृतीत सांग या दडलय काय?
नशा
एक पूर्णत्वाची.....
मुठीत सांग या दडलय काय?
शक्ति
आपल्या कार्याची.....
सृष्टीत सांग या दडलय काय?
भक्ती
रम्य निसर्गाची
जीवनात सांग या दडलय काय?
शोध
आगळा ध्येयाचा
मृत्यूत सांग या दडलंय काय?
बोध
अंतिम सत्याचा.
