STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
164

थोर जिजाऊ आदर्श माता

केलें संस्कार बालशिवबांवर

घेऊन वसा स्वराज्यस्थापनेचा

घडविले पुत्रालाच रणधुरंधर

जपुन तिने पोरक्या संभाजीला

ओळखला स्वकीयांचाच कावा

पित्यापाठी दिले शस्त्रप्रशिक्षण

घडविला महाराष्ट्रासाठी छावा

दुधवाली रायगडीची हिरकणी

ममतेपोटी बनली रणरागिणी

किर्रर्र रात्रीचा टकमक कडा

उतरली धैर्याने ती बावनखणी

हसूनी खेळूनी नारी कुटुंबात

दुःखे गिळतेच आतल्या आत

दुसऱ्यांसाठी झिजे चंदनापरी

महत्वाकांक्षाही तिच्या उरांत

क्षणांची पत्नी आयुष्यभर माता

आजी बहीण नात्यानेच वहिनी

नानारूपात फिरतेच समाजांत

हर स्त्रीची निराळी एक कहाणी

सलाम करू तिच्या स्त्रीशक्तीला

उचलुन वाटा समाजप्रबोधनाचा

मुलगा मुलगी नसावा भेदभाव

डंकाच पिटू कन्येच्या कर्तृत्वाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन