स्त्री
स्त्री
स्त्री म्हणजे बाजारतलं खेळणं नाही,
पिशवीत घालून आणण्याचं सामान नाही॥
स्त्री म्हणजे रस्त्यावर पडलेला कचरा नाही,
उचलुण कुंडीत टाकुण देण्याची घाण नाही॥
स्त्री म्हणजे हाताखालचं बाहुलं नाही,
जसं फिरवता येईल तशी भिरकी नाही॥
स्त्री म्हणजे चार भितींच्या आत कोंडण्याचं दुकान नाही
स्टोअर रुम मधील टाकलेलं साहित्य नाही॥
स्त्री म्हणजे वंगाळ बोलण्याचा प्राणी नाही,
नंदीबैलासारखी मान डोलवणारी नाही॥
स्त्री म्हणजे प्रत्येक गोष्टीत हा म्हणणारी नाही,
दुसर्याच्या पायाखाली दाबुन राहणारी व्यक्ति नाही॥
स्त्री म्हणजे दररोज भरणारा मेला नाही,
अपमानाला बळी ठरणारी नाही॥
स्त्री म्हणजे कुणाची संपत्ती नाही,
पोत्यात भरुण ठेवण्याची धान्याची रास नाही॥
स्त्री म्हणजे नुसती द्वेषाने भरलेली व्यक्ती नाही,
लज्जास्पद ऐकुण घेणारी ती शक्ती नाही ॥
