स्त्री
स्त्री
1 min
150
मनाचं कोंदण,
आत्मी घाव,
पिलांमध्ये जीव
अडकून राही....
संकटे अनेक,
दुशने देती जण,
कमतरता कार्यात,
सतत काढत राही....
नसे तिस स्वातंत्र्य,
काळ्या मण्यात अटकून,
जीवनाचा प्रवास,
ती कापत राही....
नसे तिचे मत,
अपमान सतत,
तरीही समाधानाने,
ती घर सांभाळत राही....
