STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

स्त्री

स्त्री

1 min
225

जीवनात पुरुषाच्या

स्त्रीविना अर्थ नाही

कर्तबगारी त्याची

स्त्रीविना सार्थ नाही


स्त्री-पुरुष साथ ही

सृष्टी नि प्रकृती आहे

तिचीच साथ खरे तर

त्याच्यासाठी प्रेरक आहे


सत्वहीन- तत्वहीन अशा

पराभूत पुरुषाला देते स्त्री

नव्याने लढण्याची शक्ती

आगळी तिची प्रेमभक्ती


उभी असे ज्याच्या सोबत

एक स्त्री बनून त्याची प्रेरणा

चमत्कार घडे या साथीने

प्रेरक जोडीदार देई प्रेरणा


Rate this content
Log in