स्त्री
स्त्री
"श्रीगणेशाची शारदा" तू
सप्तसुरांची "सरस्वती" तू
शब्दयुक्त "कविता" तू
साहित्याची "सरिता" तू.......१
ज्ञानेशाची "ज्ञानेश्वरी" तू
तुकोबाची "गाथा" तू
श्रीकृष्णाची गीता" तू
संतांचे "वाड्मय" तू........२
"शिवबाची" शिवानी तू
सळसळती तलवार "भवानी" तू
धगधगती "सौदामिनी" तू
झाशीची "मनकर्णिका" तू.........३
"गजाननाची" विद्या तू
"शक्तीचा" तांडव तू
"सदाशिवाचे" त्रिनेत्र तू
आदिमाया "आदिशक्ती" तू..........४
शेतकऱ्यांची "माय" तू
"ईश्वराची" नितांत "भक्ती" तू
कष्टाची "भाकर" तू
कलेची "मूर्ती" तू............५
विश्वाची "जननी" तू
आदि अंती "सर्वस्व" तू
अथांगतेचे "अस्तित्व" तू
संकटहरण "तेजस्विता" तू........६
सावळ्याची "यशोदा" तू
नक्षत्रांची "सम्राज्ञी" तू
प्रभूची "कौसल्या" तू
मृत्तिकेचा "दरवळ" तू.......७
षंढांचा "कर्दनकाळ" तू
"रुद्राचा" अवतार तू
दुष्टांचा "मर्दनकाळ" तू
विनाशी "ब्रह्मास्त्र" तू............८
गारव्याची "स्वामिनी" तू
मायेचा "स्पर्श" तू
निद्राणीची "अंगाई" तू
सुखाची "सावली" तू............९
