स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
302
नवशक्ती तू आई
नऊ रुपे नऊ दिवस
नवशक्ती तू आई
भावभक्ती श्रद्धेने
गाऊ तुझी नवलाई
हाकेला पावशी
संकटात धावशी
प्रवृत्ती दृष्ट
संपवले किती अशी
चंड मुंड महिषासुर
तूच संपवले माते
करोणा रुपी राक्षस
पृथ्वी संपू पाहाते
एकदाही हाकेला
संपवुणे त्याला
विणाश करी फार
मारी बाळ वृद्ध तरुणाला
यावे त्वरे आई
आम्ही वाट पाहे
जागर करितो
ज्योत जळत राहे
