STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Others

3  

RohiniNalage Pawar

Others

'स्त्री' शक्ती

'स्त्री' शक्ती

1 min
203

खट्याळपणा सोडला

मिश्किल हसणं जोडलं

तोडूनी शृंखला अमर्यादेच्या 

हसत हसत

लक्ष्मण रेषेच्या संसारात पाऊल टाकलं...


डोक्यावर पदर घेतला

संस्कारांची ओढणी सांभाळली

फक्त चूल आणि मूलाची शृंखला

मी स्वतःच्या पायावर उभी राहून मोडली...


घर सांभाळून 

संसार ही सांभाळला

नातेवाईकांच्या शब्दांना मानही दिला

दुसऱ्यांना हवं नको ते सगळं पाहिलं

फक्त दुसऱ्यांसाठी जगण्याची शृंखला तोडून

स्वतःलाही स्वतःच्या आवडीत गुंतवलं...


वाईट नजरा जेव्हा जेव्हा पडतील

तेव्हा तेव्हा त्यांना नजरेनेच रोखेल

अत्याचाराच्या त्या शृंखला मी

खंबीर होऊन मोडकळीस आणेल...


Rate this content
Log in