STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

*स्त्री म्हणजे खेळणे नव्हे*

*स्त्री म्हणजे खेळणे नव्हे*

1 min
308

स्त्री म्हणजे खेळणे नव्हे 

स्त्री ही मायेचे आगर आहे 

मानवाची ती उत्पती आहे

ती नसेल तर मानव जन्म कसा होणार 

स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीचा साज आहे...

आम्ही कर्तृत्वशाली दिव्य पताका

समजू नका कमजोर तट किनारा,

नको कुणाची दयादृष्टी ,सहानुभूती

सक्षम सबळ आहोत आम्ही स्त्रीया.....

स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीचा साज आहे...

जगाच्या इतिहासात कैक स्त्रीयांनी 

राज-ताज गाजवलेेले आहेत

कई कारनामें करून आपल्या

स्त्रीत्वाच दर्शन केलेले आहे.....

स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीचा साज आहे...

स्त्रीया काही कमजोर नाही

घोषा, अपाला, विश्ववारा,लोपा, मुद्रा

शची,अश्या कित्येक स्त्रीयांनी विश्वात

नाव अमर केले आहे....

स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीचा साज आहे...

पौलोमी,व्रांगभणी,रोमया,सुर्या

ममता,जहू,श्रद्धा,यमी कित्येक नावे 

आजही चमकत आहे.

त्या कर्तत्वाच्या आकाशातल्या तारका

होवून आजतागायत विचरन करित आहे....

स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीचा साज आहे...

हल्लीच्या युगात ही स्त्रीयांनी आपले 

धृवताऱ्याप्रमाने अढळ स्थान बनविले,

अश्या दिव्य तेजस्वी सावित्रीबाई फुले, 

अहिल्याबाई होळकर,इंदिरा गांधी

प्रतिभाताई पाटील यांची श्रेष्ठता

सुवर्णक्षरात झळकत आहे...

स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीचा साज आहे...

Rate this content
Log in