स्त्री जन्माचे स्वागत
स्त्री जन्माचे स्वागत
1 min
177
स्त्री तुझी कहाणी
शून्यातून सुरू झाली
स्वागत तुझ्या जन्माचे
धन्य तुझीच माऊली
बहीण बनून तुला
भावास घ्यायचे समजुन
बहिणीस लावूनी माया
जन्माचे सार्थ करून
लाडली तू आज बापाची
आई बनून सेवा करी
ज्या घरी तू जाशील
बेटी बनून हाक मारी
पत्नी तू एक सहचरणी
खांद्यास खांदा देई
तूच अशी अर्धांगनी
पतीचे प्रेम मिळवून घेई
जननी तू तुझ्या लेकराची
माया ममता चा खजिना
निपक्ष प्रेम तुझे गं
दुःख मुलांचे तुला सहिना
अशी नारीशक्ती भूतलावर
रूप तुझे अगणित
सर्वांच्या मनात आदर
प्रणाम करुनी आहे स्वागत!!
