STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

स्त्री जन्म

स्त्री जन्म

1 min
301

अवघे विश्व कल्पनेत साकारते

अशी सर्वव्यापी चेतना झाली..!

काय मांडावी गोडवी कोणी

हजारो सूर्य ती झुकवित आली..!


कधी शारदा तर लक्ष्मी ती

शब्दांत वर्णेल का तिची थोरवी..!

तिच्या वाचूनी निरर्थक चराचर

वसंतात फुलणारी ती पालवी..!


कधी माय त्या गुणी लेकरांची

करते संस्कार शिंपण जगण्याचे..!

सारे दुःख घेते पोटात

बळ देते त्यास हिंमतीने लढण्याचे..!


नाही अबोल ती आहे सौदामिनी

तिच्या उदरातून जन्मतो हा पुरुषार्थ..!

कशी वांझ बुद्धी समाज लेतो

स्त्री म्हणून हिणवून साधतो परमार्थ...!


किती यातना स्त्री जन्मात आहे

तरी निरागस हास्य दुःखात देते..!

भाग्य बांधले तिच्या ललाटी

रहस्यावधी चंद्र येथे फुलवते..!


Rate this content
Log in