स्त्री ही बंदिवान
स्त्री ही बंदिवान
1 min
12.1K
झिजले कितीही शरीराने
तमा कोणास नाही
उरले काय तिचे
मुक्तता काय कामाची
बंद घरात ही
बंदिस्त ही राहिली
मोकळं सोडलं तरीही
बंदिवासात अडकून राहिली
झिजून ही सगळ्यांसाठी
काय जन्म व कशासाठी
गमवून सगळं हे
जगते का व कशासाठी
ओळखून सगळे जरीही
अपमान तिचा होई
कोणी ना दूजाभाव
झुरते एका प्रेमासाठी
हालहाल तिचे होई
कुचेष्टा सगळीकडे होई
निद्रेत जग हे
जग कोणाला ना आली
